Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedकाँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आदिवासी नेते संभाजी कोवे यांचे निधन

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आदिवासी नेते संभाजी कोवे यांचे निधन

अभय मुणोत विशेष प्रतिनिधि कोरपना तालुका

कोरपना :- काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आदिवासी लोकनेते व कोरपणा पंचायत समितीचे माजी उपसभापती मा. संभाजी कोवे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने झोपेतच दुर्दैवी निधन झाले.

त्यांच्या अकस्मात जाण्याने आदिवासी समाजासह काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. अत्यंत साधं राहणीमान, सुसंस्कृत स्वभाव आणि जाणकार नेतृत्व या गुणांनी ते नेहमीच लोकांच्या मनात घर करून होते. ते सावलहिरा ग्राम पंचायतचे सरपंच व सेवादलचे कोरपना तालुका अध्यक्ष पदावर कार्य करित होते . कांग्रेस पक्षात कोरपना तालुक्यातील एक सच्चा कांग्रेस सेवक म्हणून त्यांची प्रतिमा होती . माजी आमदार सुभाष धोटे यांचे ते खंदे समर्थक होते.

त्यांच्या निधनाने आदिवासी समाजाने एक कर्तृत्ववान नेतृत्व गमावले आहे. ही पोकळी भरून न निघणारी असून त्यांच्या स्मृती समाजाच्या प्रेरणेतून कायम जिवंत राहतील. त्यांच्या पश्चात कुटुंबात पत्नी – दोन मूल -मुलगी आहेत अशी माहिती उत्तम पेचे अध्यक्ष तालिका कांग्रेस कोरपना ह्यांनी दिली .

 

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular