Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedपरंपरेला उजाळा : विरुर येथील विजय स्तंभाची पूजाअर्चा

परंपरेला उजाळा : विरुर येथील विजय स्तंभाची पूजाअर्चा

 

राजुरा तालुका प्रतिनिधि : प्रविण चिडे, विरुर

विरुर :-
गडद इतिहासाची साक्ष व समृद्ध परंपरेचा वारसा जपणाऱ्या विरुर येथील बालाजी देवस्थानाच्या परिसरात उभारलेला विजय स्तंभ आजही ग्रामस्थांच्या श्रद्धेचा आधारस्तंभ ठरतो आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार दरवर्षी विजयादशमी व पोळा या दोन महत्त्वाच्या सणांनिमित्त ग्रामस्थ एकत्र येऊन विधीवत पूजाअर्चा करतात.

यंदाही गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुणाई व बालकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने पूजाविधी पार पडले. या प्रसंगी संपूर्ण गाव धार्मिक वातावरणात रंगून गेला होता.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा विजय स्तंभ केवळ एक दगडी स्तंभ नसून तो वीरतेचे, पराक्रमाचे व ग्रामसंस्कृतीचे प्रतीक आहे. या परंपरेमुळे गावात एकोपा, ऐक्य व धार्मिक सलोखा दृढ होत असल्याचे नागरिक सांगतात. विशेष म्हणजे पोळा सण हा शेतकऱ्यांचा सण असल्याने बैलपूजनाबरोबर विजय स्तंभाची पूजा करणे ही परंपरा अखंड सुरू असून ग्रामीण संस्कृतीच्या जिवंततेचे द्योतक ठरते.

बालाजी देवस्थानाच्या अंगणात उभा असलेला हा विजय स्तंभ ऐतिहासिक दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. स्थानिक नागरिकांनी या स्तंभाचे जतन व संवर्धन करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून पुढील पिढ्यांनाही या परंपरेचे आणि इतिहासाचे महत्त्व कळू शकेल.

👉 गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, परंपरेची जपणूक आणि ऐतिहासिक वारशाचा गौरव यामुळे विरुरातील विजय स्तंभ आजही ग्रामस्थांच्या श्रद्धास्थानाचा भाग ठरत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular