पहिल्याच पावसात ३२ कोटी चा रस्ता उखड़ला .. ५६% टक्के कमीशनच जीवंत उदाहरण..
वणी: ( आयुष ठाकरे . यवतमाळ जिल्हा प्रतिनिधि )
रस्त दुरुस्ती आणि कामात नियम धाब्यावर बसवून भ्रष्ट कारभार कसा चालतो, याचा जीवंत नमुना वणी परिसरात पाहायला मिळत आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी आवश्यक असलेली गिट्टी आणि बोल्डर वापरण्याऐवजी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि संबंधित ठेकेदार चक्क बाजूची माती रस्त्याच्या खड्ड्यांत ढकलत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अपघाताची टांगती तलवार आणि कंत्राटदाराची मनमानी
पावसाचे दिवस असताना रस्त्यात माती टाकल्यामुळे संपूर्ण रस्त्यावर दलदल आणि चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे:
दुचाकीस्वारांचे आयुष्य धोक्यात: माती व चिखलामुळे गाड्या घसरून मोठे अपघात होण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे.
ठेकेदाराला अधिकाऱ्यांचे अभय: निकृष्ट दर्जाचे काम करून शासकीय निधीची उधळपट्टी करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी बांधकाम विभाग डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
अपघात झाल्यास PWD अन् ठेकेदार जबाबदार!
स्थानिक नागरिकांनी या निष्काळजीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून बांधकाम विभागाचा जाहीर निषेध केला आहे. रस्त्याचे काम नियमानुसार दर्जेदार गिट्टी-बोल्डर वापरून तात्काळ पूर्ववत न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. भविष्यात या रस्त्यावर कोणताही लहान-मोठा अपघात घडल्यास त्याला पूर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभाग वणी आणि संबंधित ठेकेदारच जबाबदार राहतील, असा सज्जड इशारा स्थानिकांनी दिला आहे.



