काहीणी लुटली शिक्षण संस्थाने तर अभिजीत भूते नि लाटली स्थावर मालमत्ता ! रक्षकच झाले भक्षक !
विशेष प्रतिनिधी, चंद्रपूर:
‘घरका भेदी लंका ढाये’ या म्हणीचा प्रत्यय आणून देणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना राजुरा येथे उघडकीस आली आहे. आयुष्यभर काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार स्वर्गीय प्रभाकरराव मामुलकर यांच्या निधनानंतर, त्यांच्या हयात नसलेल्या अपत्यांमुळे एकाकी पडलेल्या त्यांच्या ८४ वर्षीय पत्नी सुमनताई प्रभाकरराव मामुलकर यांची तब्बल ५ कोटी रुपयांची मालमत्ता कौटुंबिक विश्वासाचा गैरफायदा घेऊन हडप करण्यात आल्याचा गंभीर आरोप झाला आहे.
याप्रकरणी सुमनताई यांनी आपल्याच बहिणीचा मुलगा आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध राजुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीची लेखी तक्रार दाखल केली आहे.
मदतीचा आव आणून घरात शिरले, वृद्धापकाळात घरूनच हाकलले !
मिळालेल्या माहितीनुसार, पती कै. प्रभाकरराव मामुलकर यांच्या निधनानंतर सुमनताई यांचे वय (८४ वर्षे) आणि आजारपण लक्षात घेता, त्यांना मदतीची गरज होती. याच परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी त्यांच्या बहिणीचा मुलगा *अभिजित भुते* आणि त्याची पत्नी शिल्पा भुते हे दोघे सुमनताईंच्या राजुरा येथील घरी राहण्यास आले.
सुमनताईंनी विश्वासाने त्यांच्यावर घरातील आर्थिक आणि इतर व्यवहारांची जबाबदारी सोपवली होती. अगदी सुमनताईंच्या पेन्शनची रक्कमही तेच काढत होते. मात्र, रक्षकच भक्षक बनतील याची पुसटशीही कल्पना वृद्ध सुमनताईंना नव्हती.
अशी झाली पाच कोटींची फसवणूक:
तक्रारीत नमूद केल्यानुसार, २३ मे २०२५ रोजी ‘जमीन खरेदीसाठी कागदपत्रांवर स्वाक्षरी करायची आहे’ असे खोटे सांगून सुमनताईंना राजुरा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नेण्यात आले. तिथे अभिजित भुते, शिल्पा भुते यांच्यासह आशिष नलगे, बबन भुते आणि धनराज चिंचोलकर हे उपस्थित होते.
खोटे दस्तऐवज: त्या दिवशी विविध मालमत्तांबाबत विक्रीपत्रे आणि बक्षीसपत्रे करून घेण्यात आली.
मालमत्तांची लूट: राजुरा व सुबई येथील घरे, तसेच अंतरगाव आणि सुबई येथील मौल्यवान शेतजमिनी संबंधित संशयितांनी फसवणूक करून स्वतःच्या नावावर हस्तांतरित करून घेतल्या.
अंदाजे किंमत: या हडप केलेल्या संपूर्ण मालमत्तेची बाजारपेठ किंमत सुमारे *५ कोटी रुपये* असल्याचे सांगण्यात येत आहे.
कागदपत्रे समोर आल्यावर फुटले भांडं !
काही दिवसांनी सत्यप्रती (कागदपत्रे) मिळवल्यानंतर आपली फसवणूक झाली असून संपूर्ण मालमत्ता दुसऱ्यांच्या नावावर हस्तांतरित झाली असल्याचे सुमनताईंच्या निदर्शनास आले. या धक्कादायक प्रकारानंतर त्यांनी २८ जून रोजी राजुरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन कायदेशीर तक्रार दाखल केली. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि आपली मालमत्ता परत मिळवून द्यावी, अशी आर्त हाक त्यांनी प्रशासनाला दिली आहे.
या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेला रविकांत निंबाळकर, किरण निंबाळकर, सुनीता चाळके आणि मोहित निंबाळकर उपस्थित होते. तर दुसरीकडे, या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अभिजित भुते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
थोडक्यात प्रश्न: ज्या नेत्याने आयुष्यभर समाजाची सेवा केली, त्यांच्या पश्चात त्यांच्या वृद्ध पत्नीला स्वतःच्याच घरातून हुसकावून लावणारे हे नातेवाईक रक्षक आहेत की गिधाड? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून वृद्ध माऊलीला न्याय द्यावा, हीच अपेक्षा.



