Saturday, April 18, 2026
Google search engine
Homeक्राइम नामासामाजीक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे यांनी मागितले पोलीस संरक्षण

सामाजीक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे यांनी मागितले पोलीस संरक्षण

चंद्रपूर:

जिल्ह्यातील विविध कंपन्या आणि महसूल विभागातील नियम बाह्यप्रकरणे चव्हाट्यावर आणणारे माजी तलाठी , सामाजिक कार्यकर्ते तथा आरटीआय जिल्हा अध्यक्ष विनोद खोब्रागडे यांनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या जिवाला धोका असल्याचे सांगत, राज्य सरकारकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिल्या बाबत सोशल मीडिया द्वारे कळविले आहे .

हजारो कोटींच्या शेत जमीन घोटाळ्याचा आरोप
खोब्रागडे यांनी आपल्या निवेदनात केले आहेत हे विशेष .

संबंधित कंपन्या आणि महसूल विभागातील काही अधिकारी मिळून हजारो कोटींच्या राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करत आहेत.
आदिवासी आणि शेकडो शेतकऱ्यांवर अन्याय करून त्यांच्या जमिनी हडपण्याचे प्रकार समोर आले आहेत.

नियम धाब्यावर बसवून पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी केली जात आहे.
या संपूर्ण ‘महाघोटाळ्याचा’ पर्दाफाश करण्यासाठी कायदेशीर लढ़ा उभा केल्यामुळे संबंधित अधिकारी आणि कंपन्यांचे पदाधिकारी आकसबुद्धीने वागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘व्हिसलब्लोअर’ कायद्यांतर्गत संरक्षणाची मागणी त्यांनी केली आहे .

या संदर्भात केपीसीएल, अरबिंदो व सीमेंट कंपनीचे व्यवस्थापन प्रतिनिधि यांची प्रतिक्रिया घेण्याकरीता संपर्क केला असता त्यांनी आरोप तथ्यहीन तसेच स्टंटबाजी करीता केले असावेत असे बोलन्यात आले . कंपनी विरुद्ध शेतकरी कायदेशीर मार्गाने कोणी लढत असेल तर त्यात गैर काहीच नाही . शेतकरी बांधवांचा तो अधिकार आहे कारण की ते भु-स्वामी आहे .  आम्ही शेतकरी बांधवांशी चर्चा करून मार्ग काढु पण कोणत्याही परिस्थितित जो प्रकल्प बाधित नाही अश्या व्यक्ति सोबत चर्चा करने हे कंपनी प्रोटोकॉल नुसार नियमबाह्य आहे . जमीन अधिग्रहण झाले तेव्हा आम्ही कंपनी सेवेत नव्हतो . अश्या परिस्थितीत भाष्य करने योग्य होणार नाही .  महसूल प्रशासन योग्य निर्णय घेईल .एकूणच हे प्रकरण शंका कु शंकान्ना पेव फुट नारे दिसत आहे ..

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular