Saturday, April 18, 2026
Google search engine
Homeमहसुल वार्ताकोरपना तालुक्यातील (वनोजा) झोटिंग घाटावरून पैनगंगा नदीपात्रातून हजारो ब्रास रेती चोरीला

कोरपना तालुक्यातील (वनोजा) झोटिंग घाटावरून पैनगंगा नदीपात्रातून हजारो ब्रास रेती चोरीला

कोरपना / चंद्रपुर ( गौतम भसारकर )

कोरपना तालुक्यातील वनोजा गावाजवळील झोटिंग घाटावरून पैनगंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात हजारो ब्रास रेतीची खुलेआम चोरी सुरू आहे. अवैध रेती उत्खनन व वाहतूक दिवसाढवळ्या सुरू असून प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.

हनुमंत पेंदोर यांच्या शेतातून नदीपात्रात जाण्यासाठी बनविला रस्ता रेती तस्करीसाठी हनुमंत पेंदोर यांच्या शेतातून थेट नदीपात्रात जाण्याकरिता बेकायदेशीर रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावरून अवजड वाहने सातत्याने नदीपात्रात प्रवेश करत असून नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची उचल केली जात आहे .

महसूल विभागाची वाळू तस्करांना साथ

इतक्या मोठ्या प्रमाणावर रेती तस्करी सुरू असताना महसूल विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने वाळू तस्करांना थेट साथ देत काही शासकीय कर्मचारी सुद्धा रेती तस्करी करीत असल्याची खात्रीलायक माहिती आहे

सात ते आठ हजार रुपये प्रति बॉस दराने रेतीची विक्री

अवैधरीत्या उपसलेली रेती प्रति बॉस सात ते आठ हजार रुपये दराने विकली जात असून या माध्यमातून लाखोची माया दर दिवशी जमा केली जात आहे.

शासनाने सर्वसामान्य नागरिकांना नदीपात्रातून रेती नेण्याची परवानगी देण्याची मागणी

सर्वसामान्य नागरिकांवर निर्बंध लादले जात असताना रेती माफियांना मोकळे रान दिले जात असल्याचा आरोप होत असून, शासनाने ज्या नागरिकांना रेतीची आवश्यकता आहे अशा नागरिकांना थेट नदीपात्रातून रेती नेण्याची परवानगी द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

पर्यावरण व जलचर प्राण्यांना मोठा धोका
या अवैध रेती उत्खननामुळे पैनगंगा नदीचे नैसर्गिक स्वरूप बिघडत असून पर्यावरणासह जलचर प्राण्यांच्या अस्तित्वाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

कोरपना तहसीलचे तहसिलदार यांचा  रेती तस्करांना आशीर्वाद

नदीपात्राताचे निरीक्षण केल्यास त्यात मोठ मोठे खड्डे पडले आहेत त्यावरून हजारो ब्रास रेती उत्खनन करून चोरी केल्याचे स्पष्ट दिसते. इतक्या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने कोरपना तहसीलदारांचे मौन म्हणजे रेती तस्करांना मिळालेला आशीर्वाद असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. महत्वाची बाब म्हणजे तहसीलदार मुख्यालयी राहत नाही आणि सामान्य जनतेचे फोन रिसीव करित नाही याबाबत तालुक्यातिल नागरिकां मध्ये कमालीची नाराजी आहे . त्यांना अवैद्य गौण खनिज तस्करी विषयी अनेका माहिती देण्यासाठी तालुक्यातील विविध भागातून नागरिक फोन करतात पन त्या प्रतिसाद देत नाही परिणामी वनोजा पुलाच्या खालून ५०० मि. चे आत उत्खनन झाले त्यामुळे पूलाचे नुकसान झाले आहे .  कोरपना तालुक्यातील ह्या गंभीर प्रकारणाची  जिल्हाधिकारी महोदयांकडे माहिती गेली असल्याने जिल्ह्या महसूल प्रशासन तहसीलदार पल्लवी आखरे ह्यांच्या विरुद्ध काय कारवाही करते याकड़े नागरिक गांभीर्याने लक्ष देत आहेत .

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular