Tuesday, June 2, 2026
Google search engine
Homeशेती वार्ताविरुर चिंचोली मार्गावर अवैद्य ओव्हरलोड वाहतूक सुरु - होमगार्डचा अवैद्य वसुली धंदा...

विरुर चिंचोली मार्गावर अवैद्य ओव्हरलोड वाहतूक सुरु – होमगार्डचा अवैद्य वसुली धंदा रे बाबा – शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण

विरुर / चंद्रपुर का.प्र.

विरुर-चिंचोली मार्गावरून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक सुरू असून, या वाहतुकीला विरुर पोलिसांचे उघड संरक्षण मिळत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. विशेषतः विरुर येथील एका होमगार्डकडून वाहतुकी दरम्यान उघडपणे अवैध वसूली केल्याची चर्चा सध्या चोहोबाजूंनी रंगली आहे. अवैध वसुलीच्या या खेळामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, सीमार्ति तेलंगाणा राज्यातील काही कृषी केंद्र संचालक व खुदरा व्यापारी हे थेट शेतकऱ्यांकडून अत्यंत कमी दरात कापूस खरेदी करत असल्याचा गंभीर आरोप पुढे येत आहे. मार्केटमध्ये योग्य भाव न मिळणे, त्यातच वाहन भाड्याचा वाढता खर्च परवडत नसल्याने शेतकरी गावीच आपला माल विकण्यास मजबूर आहेत. कष्ट करून पिकवलेला कापूस, शेतकरी मात्र तोट्यात तर व्यापारी आणि कृषी केंद्र संचालक भारी नफ्यात — अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

याचा थेट फटका शेतकऱ्यांबरोबरच विरुर-चिंचोली परिसरातील नागरिक, तसेच या मार्गावरून रोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील सहन करावा लागत आहे. रस्त्यावरून जाणारी ओव्हरलोड वाहने धूळ, दाट प्रदूषणा मुळे जीविताला धोका निर्माण झाल आहे.

अन्नदाता उपाशी, व्यापारी तुपाशी — ही वस्तुस्थिती बदलणार कोण?
स्थानिक प्रशासन, पोलीस विभाग आणि महसूल यंत्रणा यांना या अवैद्य साखळीवर अंकुश आणण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. अन्यथा मोठ्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही विरुर चिंचोली परिसरातील नागरिकांकडून देण्यात येत आहे..

विरुर पोलिस स्टेशन साठी अवैद्य वसूली व ओवरलोड वाहनांना पोलिसांचे सरक्षण आहे काय ह्यविषयी ठानेदार श्री वाकड़े ह्यांना त्यांचे मोबाईल फोनवर  संपर्क केला परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही .

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular