भूमरेड्डी गिज्जेवार यांच्या आशीर्वादाने बेकायदेशीर कारभार; भू-माफियांच्या वादग्रस्त जमिनी मोजण्यासाठी मोठी रक्कम व हिस्सेदारीची चर्चा !
जिल्हा भूमि अधीक्षक प्रदीप जगताप हे गीज्जेवार व जिल्ह्यातील अन्य उप भूमि अभिलेखा अधिकारी यांना भ्रष्टाचार करण्यासाठी खुली सूट देत आहेत काय ?
चंद्रपूर (विशेष बातमी प्रतिनिधी):
चंद्रपूर येथील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात भ्रष्टाचाराचा कळस गाठला गेला असून, उप भूमि अधीक्षक भूमरेड्डी गिज्जेवार हे दलालांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यालयाचे संचालन करत असल्याचा गंभीर आरोप कामगार नेते व सप्ताहिक श्रमिक मंथन व डिजिटल मीडिया पोर्टल चे संपादक विजय ठाकरे यांनी केला आहे . भू-माफियांसोबत संगनमत करून वादग्रस्त व बेकायदेशीर जमिनींची मोजणी करून देण्यासाठी लाखो रुपयांची लाच आणि जमिनींमध्ये थेट हिस्सेदारी घेतली जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली असून दाताळा येथील सर्वे नंबर २१४ पैकी ११ गुंटे ज़मीनी महसुल आयुक्त यांचे आदेशा विना न्याय प्रविष्ट जागेची मोजनी करून त्यापैकी अर्ध्याअधिक जागा गिज्जेवार यांचे सहकारी राठौड़ व अन्य लोक सेवक यांनी मुळ मालकाला लागत मूल्य देऊन घेतल्याची माहिती सूत्राकड़ून मिळाली आहे .
दाताळा येथील ‘त्या’ वादग्रस्त जमिनीची संशयास्पद मोजणी !
भूमरेड्डी गिज्जेवार कार्यरत असलेल्या चंद्रपुर कार्यालयातील सावळागोंधळाचा एक धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. *मौजा दाताळा येथील सर्वे नंबर २१४* मधील प्लॉटच्या मोजणीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तक्रारदार *विजय ठाकरे* यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण ?
न्यायालयीन वाद सुरु असताना कारवाई: सदर जमिनीबाबत मागील ३० वर्षांपासून न्यायालयात वाद सुरू असून (अदिवाणी दावा क्रमांक १७७/२०१६), न्यायालयाने यापूर्वीच मोजणीसाठी ‘कमिशनर’ नियुक्त केला आहे. असे असतानाही खाजगी स्तरावर शासकीय मोजणी करणे हा थेट *न्यायालयाचा अवमान* ठरतो.
नियम धाब्यावर बसवून संशयास्पद घाई: अर्जदार भालचंद्र आडवाणी यांनी दिलेल्या अर्जावर कोणताही ‘अर्ज क्रमांक’ किंवा ‘दिनांक’ नसतानाही, कनिष्ठ लिपिक दत्तात्रय विठ्ठल राठोड यांनी अवघ्या १४ दिवसांच्या आत (११ फेब्रुवारी रोजी) नोटीस काढून २० फेब्रुवारी रोजी मोजणी निश्चित केली.
फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी
या संपूर्ण गैरव्यवहार, पदाचा दुरुपयोग आणि भ्रष्टाचाराविरोधात तक्रारदार विजय ठाकरे यांनी जमाबंदी आयुक्त भूमी अभिलेख कार्यालयाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
कनिष्ठ लिपिक दत्तात्रय राठोड व मोजनी प्रकरण अर्जदार भालचंद्र अडवाणी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार *फौजदारी गुन्हे* दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हा प्रकार ‘महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९’ चा थेट भंग असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
चंद्रपुर भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी भूमरेड्डी गिज्जेवार आणि कर्मचारी भू-माफियांच्या तालावर नाचत असल्याने सामान्य नागरिकांचे हक्क पायदळी तुडवले जात आहेत. दलालांची साखळी मोडून काढून उप भूमि अधीक्षक भूमरेड्डी गिज्जेवार यांच्यासह संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी विजय ठाकरे यांनी संबंधित विभागाकडे मंत्रालय मुंबई येथे तक्रार दाखल केली असल्याची माहिती दिली आहे . चंद्रपुर तालुक्यातील अनेक वादग्रस्त शेती-अकृषक प्लॉट व चंद्रपुर शहरातील सिटी सर्वे आखिव पत्रिका धारक जागेची मोजनी करून बरेच गैरप्रकार झाल्याबाबत साप्ताहिक श्रमिक मंथन नी वृत्तांकन करण्यासाठी अन्यायग्रस्त नागरिकांनी कागदपत्रे दिल्याची माहिती मिळाली आहे . जिल्हा भूमि अधीक्षक प्रदीप जगताप हे गीज्जेवार व जिल्ह्यातील अन्य उप भूमि अभिलेखा अधिकारी यांना भ्रष्टाचार करण्यासाठी खुली सूट देत आहेत काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे . जिल्हाधिकारी चंद्रपुर हे ह्या प्रकरनावर काय कारवाही करतात हे बघने महत्वपूर्ण ठरणार आहे .



