Tuesday, June 2, 2026
Google search engine
Homeमहाराष्ट्र पोलीसराजुरा पोलिसांची पुलाखाली वाहन तपासणी'अवैध'! नागरिकांशी अर्वाच्य भाषेत अरेरावी !

राजुरा पोलिसांची पुलाखाली वाहन तपासणी’अवैध’! नागरिकांशी अर्वाच्य भाषेत अरेरावी !

 सरपंचांने केले चित्रीकरण! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

राजुरा/चंद्रपूर: ( भाग १ ) 
पोलीस जेव्हा आरोपी सारखी वागणूक जनतेला देत असतील तेव्हा जनतेने कुणाकडे पाहायचे? असा संतप्त सवाल सध्या राजुरा तालुक्यात विचारला जात आहे. राजुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कापनगाव ओव्हरब्रिजखाली पोलीस कर्मचाऱ्यांकडून सुरू असलेल्या कथित अवैद्य वाहान तपासणी व नागरिकांसोबत मुजोरी’चा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, यामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग ३५३-बी वर कापनगाव लगत असलेल्या ओव्हरब्रिजखाली राजुरा पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी दुचाकीस्वारांना अडवून कागदपत्रे आणि हेल्मेटच्या नावाखाली दंडाची मागणी करत होते. विशेष म्हणजे, हे कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या ‘ड्युटी स्पॉट’वर नसून शहराबाहेर पुलाच्या आडोशाला उभे राहून ही कारवाई करत असल्याचे समोर आले आहे.
यावेळी आर्वी ग्रामपंचायतीचे *सरपंच ‘बत्ता भाऊ’*यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. “पुलाखाली पोलीस उभे राहिल्यामुळे नागरिक घाबरून विरुद्ध दिशेने (Wrong Side) वाहन पळवतात, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढतोय. तुम्ही तुमच्या नेमून दिलेल्या जागी किंवा रस्त्याच्या कडेला उभे राहून कारवाई करा,” अशी विनंती सरपंचांनी केली. मात्र, विनंती ऐकून घेण्याऐवजी ड्युटीवर असलेल्या **पोलीस कॉन्स्टेबलनी सरपंचांशी उद्धट वर्तन करून त्यांची ही गाड़ी चालान केली .

पोलीस कर्मचाऱ्याची अरेरावी आणि ‘ठाणेदारां’चे नाव

श्रमिक मंथन प्रतिनिधि नि कॉन्स्टेबल बिट्टू दुबे राजुरा ह्यांचे शी संपर्क केला असता “आम्ही ठाणेदार आसिफ रझा यांच्या आदेशानुसारच इथे कारवाई करत आहोत. काही प्रश्न असतील तर त्यांनाच विचारा.”* एवढेच नव्हे तर, बिट्टू दुबे यांनी प्रतिनिधि ला दम देत म्हटले की हा आपला वैयक्तिक मोबाईल नंबर आहे “या नंबरवर पुन्हा फोन करू नका,” असे उद्धट उत्तरही त्यांनी दिले.
बिट्टू दुबे ह्यांचा हाच नंबर बरेच नागरिकांकड़े आहे असे असताना हा जर पर्सनल नंबर होता तर पब्लिक डोमिन मध्ये कसा आला हा संशोधनाचा विषय आहे .
सरपंच बत्ता ह्यांनी पोलिसांना समजावण्याचा प्रयत्न केला असता, संतापलेल्या पोलिसांनी थेट सरपंचांच्याच गाडीचे चलन फाडले.

“नागरिकांना अशा प्रकारे वेठीस धरणे चुकीचे आहे. अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी योग्य ठिकाणी उभे राहणे गरजेचे आहे, मात्र इथे केवळ वसुलीचा उद्देश दिसत आहे.” बत्ता भाऊ, सरपंच, आर्वी

कायद्याचे उल्लंघन आणि भेदभाव?
या प्रकरणामुळे काही गंभीर तांत्रिक प्रश्नही उपस्थित होत आहेत:
नियम काय सांगतो ? मोटार वाहन कायद्यानुसार, केवळ कॉन्स्टेबल दर्जाचा कर्मचारी अशा प्रकारे स्वतंत्रपणे दंड वसुली किंवा कारवाई करू शकत नाही. तिथे किमान ASI किंवा त्यावरील दर्जाचा अधिकारी असणे आवश्यक आहे.
शहराकडे दुर्लक्ष का ? राजुरा शहरात वाहतुकीची कोंडी आणि नियम पायदळी तुडवले जात असताना, ट्रॅफिक पोलीस शहराबाहेर महामार्गावर पुलाखाली लपून कारवाई का करत आहेत?
मोठ्याना अभय ? परिसरातील रेती आणि कोळशाची ओव्हरलोड वाहतूक, तसेच कोल वॉशरीसमोर रस्त्यावर उभे असलेले अनधिकृत ट्रक यांच्यावर कारवाई करण्यास पोलीस कचरतात, मात्र दुचाकीस्वारांना लक्ष केले जाते, असा आरोप नागरिक करत आहेत.

ठाणेदारांची सावध प्रतिक्रिया
या संपूर्ण प्रकरणावर राजुराचे ठाणेदार आसिफ रझा यांना विचारले असता, त्यांनी कारवाईत API ची गरज आहे की नाही, या तांत्रिक प्रश्नावर बोलणे टाळले. “अपघात टाळण्यासाठी कारवाई करणे योग्य आहे,” असे त्रोटक उत्तर देऊन त्यांनी आपली बाजू सावरून धरली.

भयमुक्त महाराष्ट्राची अपेक्षा!
हा व्हिडिओ राज्याचे गृहमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना टॅग करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे प्रामाणिक पोलिसांची मान खाली जात असून, संबंधित उद्धट पोलीस कर्मचारी यांची कापनगाव प्रकारणात सखोल चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. आता वरिष्ठ अधिकारी याकडे गांभीर्याने पाहणार की वसुलीचे हे ‘चक्र’ असेच सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular