Saturday, June 13, 2026
Google search engine
HomeGadchandurअडानी समुहाचे अध्यक्ष श्री. गौतम अडानी यांच्या जन्मदिना निमित्त अंबुजा सिमेंट उप्परवाही...

अडानी समुहाचे अध्यक्ष श्री. गौतम अडानी यांच्या जन्मदिना निमित्त अंबुजा सिमेंट उप्परवाही येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

शेकडो कामगार आणि अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘जीवन ज्योती ब्लड बँक नागपूर’चे सहकार्य

उप्परवाही:
अडानी ग्रुपचे चेअरमन गौतम अडानी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अंबुजा सिमेंट उप्परवाही येथे भव्य रक्तदान शिबिराचे (मेगा ब्लड डोनेशन कॅम्प) यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमाचे रीतसर उद्घाटन सीएमओ श्री. सत्यनारायण यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली रक्तदान
नागपूर येथील प्रसिद्ध ‘जीवन ज्योती ब्लड बँक’ च्या तज्ज्ञ चमूच्या थेट देखरेखीखाली हे संपूर्ण रक्तदान शिबिर पार पडले. रक्तदानासारख्या पवित्र कार्यात सहभागी होत, शेकडो श्रमिक, कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अत्यंत उत्साहाने रक्तदान केले.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमाला अंबुजा सिमेंट उप्परवाहीचे युनिट हेड *रामबुआ*, चीफ मेडिकल ऑफिसर *डॉ. लक्ष्मी* उत्पादन प्रमुख सिद्धांत सोनी- एचआर प्रमुख संतोष कुलकर्णी , अंबुजा फाउंडेशनचे श्रीकांत कुंभारे, विजयक्रांती लेबर युनियनचे जिल्हाप्रमुख विजय ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी रक्तदात्यांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहित केले.

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. उद्योग जगतासोबतच सामाजिक बांधिलकी जपणे हे आपले कर्तव्य असून, ग्रुपचे चेअरमन गौतम अडानी यांच्या वाढदिवसानिमित्त राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे.”
डॉ. शिला मुंदड़ा

अंबुजा सीमेंट उप्परवाही हॉस्पिटल टीम आणि अंबुजा फाउंडेशनचे टीमने विशेष परिश्रम घेऊन हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ,अहोरात्र परिश्रम घेतले.
कंपनी व्यवस्थापन आणि युनियनच्या संयुक्त प्रयत्नांमुळे या शिबिराला कामगारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे परिसरात या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular