Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedगोंडपिपरी वाहतूक शिपायाच्या हप्ते वसुलीच्या व्हिडिओ मुळे खळबळ !

गोंडपिपरी वाहतूक शिपायाच्या हप्ते वसुलीच्या व्हिडिओ मुळे खळबळ !

चंद्रपुर :-
गोंडपिपरी शहरात वाहतूक विभागातील एका शिपायाचा रेती व्यावसायिकांडून पैशांची मागणी करणारा कथित व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे संपूर्ण तालुक्यात चर्चेचा भडका उडाला आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय?

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये शिपाई काही व्यक्तींशी बोलताना “आपल्या खिशात येणाऱ्या पैशांबद्दल” चर्चा करताना स्पष्ट ऐकू येतो. ही चर्चा अवैध वसुलीचा व्यवहार सुरू असल्याचे संकेत देते.

वादंगाला उधाण — नवी चर्चा रंगतेय…

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गोंडपिपरीत “वाहतूक शिपाई हा ठाणेदारासाठीच वसूली करतोय का?” अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
स्थानिकांमध्ये असा प्रश्न मोठ्या प्रमाणावर फिरत असल्याने पोलिस विभागाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

पोलिस विभागात खळबळ

या घटनेनंतर वाहतूक विभागात प्रचंड हलचल असून, वरिष्ठ अधिकारी तातडीने चौकशी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित शिपायावर कठोर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु वरिष्ठ अधिकारी या अवैद्य वसूली मध्ये भागीदार असतिल तर चौकशी आणि कार्यवाही दोन्ही वर प्रश्न उपस्थित केला जात आहे .

तथाकथित विडिओ ची दखल माननीय पोलिस अधीक्षक साहेबांनी घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत . चौकशी सुरु आहे . आमच्या पोलिस स्टेशन हद्दी मध्ये दारू , गौवंश तस्करी – रेती तस्करी बाबत कार्यवाहया निरंतर सुरुच आहेत . त्यामुळे कुणी हेतु पुरस्पर आरोप करत असेल तर त्यात तथ्य नाही ..
रमेश हत्तिगोटे
सहायक पोलीस निरीक्षक , गोंडपिपरी

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular