जूँनगाव नदी पात्र खाली करून टोळी पोहोचली विठ्ठलवाड़ा घाटावर – जिल्हाधिकारी यांचे उत्खनन आदेश पारित होण्यापुर्वीच अंधारात साधल्या जातो डाव
विठ्ठलवाडा / चंद्रपुर (प्रतिनिधी):
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील गरीब जनतेला हक्काच्या घरकुलासाठी साध्या मुरुमाचा टोपलीभर ढिगारा मिळणे कठीण झाले असताना, दुसरीकडे विठ्ठलवाडा-एनबोधली घाटाच्या नावाखाली चक्क नदीपात्रात मुरुमाचे अवाढव्य रस्ते बनवण्याचा प्रताप सुरू आहे. विशेष म्हणजे, हे सर्व काम कोणत्याही नियमांची पर्वा न करता भरदिवसा सुरू असून, स्थानिक तलाठी – मंडळ अधिकारी तहसील प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकारी यांचे घाटधारका सोबतचे आर्थिक हित संबंध जोपासन्यासाठी मूंग गिलून गप्प आहेत . ते पुढे असेही सांगत आहेत या पूर्वी कांग्रेस पक्षाचे आमदार होते परंतु त्यांनी कधी रेती चोरी साठी पक्षाच्या लोकांना पाठबल दिले नाही आज परिस्थिती उलट आहे .
राजकीय दबावापोटी सुरु असलेल्या रेत तस्करीला तहसीलदाराची मूक सहतमी असल्याने स्थानीक बुद्धजीवी नागरिकाद्वारे संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एनबोधली घाट सुरू करण्याच्या हालचाली सुरू असताना, नदीपात्रातून थेट ट्रक आणि अवजड वाहने नेता यावीत यासाठी चक्क नदीच्या पात्रातच मुरुमाचा मोठा भराव टाकून रस्ते तयार केले जात आहेत. नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा ठरणारे हे कृत्य पर्यावरणासाठी घातक असतानाही, कोणाच्या परवानगीने हा ‘मुरुमी रस्ता’ बनवला जातोय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सर्वसामान्यांना घरकुल बांधण्यासाठी मुरूम हवा असल्यास प्रशासनाचे हजार नियम आडवे येतात. मात्र, या ठिकाणी विनापरवाना मुरुमाची हजारो ब्रास वाहतूक बिनदिक्कत सुरू आहे. हे मुरुमाचे उत्खनन ‘अवध्य’ परिसरातून होत असल्याची चर्चा आहे. हा मुरूम नेमका कोणाचा आणि त्याचा महसूल शासनाला मिळतोय का? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
या संपूर्ण बेकायदेशीर प्रकरणामागे सत्ताधारी पक्षाचा एक बडा स्थानिक कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे. “सत्ता आपलीच आहे” या अविर्भावात नदीपात्राचे स्वरूप बदलण्याचे धाडस केले जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, दिवसाढवळ्या ट्रकच्या ये-जा सुरू असताना महसूल आणि संबंधित प्रशासनाला हे दिसत कसे नाही? की राजकीय नेत्याच्या दबावाखाली प्रशासन कारवाई करायला घाबरत आहे? अशी संतप्त चर्चा विठ्ठलवाडा परिसरात रंगली आहे.
”सामान्य माणसाने वाळू किंवा मुरूम नेला तर लगेच दंड ठोकणारे प्रशासन, सत्तेतील कार्यकर्त्याच्या या अघोरी कृत्याकडे कानाडोळा का करत आहे? हा दुजाभाव कशासाठी?”
नदीपात्रातील हे अनधिकृत रस्ते तात्काळ हटवून, मुरुमाचे अवैध उत्खनन करणाऱ्या आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित राजकीय कार्यकर्त्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा, याविरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही परिसरातील जनतेने दिला आहे.



