Saturday, April 18, 2026
Google search engine
Homeशेती वार्ताशेतकऱ्यांनी सीसीआयची नोंदणी ३० सप्टेंबरच्या आत करून घ्यावी

शेतकऱ्यांनी सीसीआयची नोंदणी ३० सप्टेंबरच्या आत करून घ्यावी

 

प्रविण चिडे राजुरा तालुका प्रतिनिधी

राजुरा : कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी यंदाच्या हंगामात आपल्या कापसाला हमीभाव मिळावा यासाठी Cotton Corporation of India (सीसीआय) कडील नोंदणी ३० सप्टेंबरपूर्वी पूर्ण करून घ्यावी,असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विकास देवाळकर यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने घेतलेल्या कापूस पिकाला हमीभाव मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने एम.एस.पी. योजना राबवली आहे. मात्र, या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची सीसीआय कडून ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे.३० सप्टेंबर तारखेपर्यंत नोंदणी न केल्यास शेतकऱ्यांना कापूस विक्रीत अडचणी येऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सभापती देवाळकर पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी आपले ७/१२ उतारे,आधार कार्ड,मोबाईल नंबर व फोटो आवश्यक तयार ठेवून नोंदणी कृषी उत्पन बाजार समिती राजुरा येथे करून घ्यावी.शासन व संबंधित अधिकाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्य केले जाईल.

कापूस हा विदर्भातील शेतकऱ्यांचा प्रमुख नगदी पीक असल्याने यंदाच्या हंगामात शेतकरी योग्य वेळी नोंदणी करून घेतल्यास हमीभावाने कापूस विक्रीची संधी मिळेल,असेही देवाळकर यांनी स्पष्ट केले.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular